इंडोनेशियात प्रवासी जहाजाच्या अपघातात चौघांचा मृत्यू

इंडोनेशियात बाली जवळच्या समुद्रात एका प्रवासी जहाजाला झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून इतर ३८ जण बेपत्ता झाले आहेत. या जहाजातून २३ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. केएम टुनु प्रतामा नावाचे हे लाकडी जहाज केटापांग बंदरातून जावाच्या पूर्वेकडच्या बेन्यूवांगी कडे जात असताना हे जहाज बुडाले.