डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

Anderson-Tendulkar Trophy : भारताचं इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावांचं उद्दिष्ट

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या अँडरसन – तेंडुलकर चषकाच्या हेडिंग्ले इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावांचं आव्हान ठेवलं आहे. दुसऱ्या डावात भारताने ३६४ धावा केल्या असून उपकर्णधार ऋषभ पंतने ११८ धावा फटकावल्या. दोन्ही डावात शतक झळकवणारा तो पहिला भारतीय यष्टिरक्षक फलंदाज ठरला आहे. के एल राहुलनेदेखील १३७ धावा केल्या. तर शेवटचे तीन फलंदाज शून्यावर बाद झाले. काल दिवसअखेर इंग्लंडने एकही गडी न गमावता २१ धावा केल्या. सामन्याचा आज अखेरचा दिवस आहे.