भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात भारतासमोर सामन्यासह मालिका गमावण्याचंही संकट

अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात आज चौथ्या दिवसाचा खेळ सुरू असून भारतासमोर सामन्यासह मालिका गमावण्याचं संकट आहे. 

 

या सामन्यात भारतानं दुसऱ्या डावात इंग्लंडसमोर विजयासाठी ३७४ धावांचं आव्हान ठेवलं आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनं आपला दुसरा डाव कालच्या १ बाद ५० धावांवरून पुढे सुरू केला. सकाळच्या सत्रात बेन डकेट आणि ऑली पोप यांना बाद करत भारतानं इंग्लंडला अडचणीत आणलं. पण त्यानंतर शतकवीर  हॅरी ब्रुक आणि अर्धशतकवीर जो रुट यांनी दमदार दीड शतकी भागिदारी करत इंग्लंडचा डावा सावरला.

 

शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या दुसऱ्या डावात ३ बाद २८६ धावा झाल्या होत्या. त्यांना विजयासाठी अजूनही ८८ धावांची गरज आहे.