भारत आणि इंग्लंड यांच्यात हेडिंग्ले इथं सुरू असलेल्या अँडरसन – तेंडुलकर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात, आज पाचव्या आणि अखेरच्या दिवशी इंग्लंडनं विजयी लक्ष्याच्या दिशेनं दमदार वाटचाल सुरू केली. या सामन्यात भारतानं इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावांचं आव्हान ठेवलं आहे. आज अखेरच्या दिवशी इंग्लडनं दुसऱ्या डावात बिनबाद २१ धावांवरून या लक्ष्याचा पाठलाग सुरू केला, आणि दुसऱ्या सत्रापर्यंत भारताच्या गोलंदाजांना एकही बळी मिळू न देता, पावणेदोनशे धावांचा टप्पा ओलांडला. इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेट यानं शतकी खेळी केली, तर झॅक क्रॉलीनं त्याला चांगली साथ देत अर्धशतक झळकावलं. ४३ व्या षटकात इंग्लंडची धावसंख्या १८८ वर असताना झॅक ६५ धावांवर बाद झाला. त्याच्यानंतर आलेला ओली पोपही लवकर बाद झाला. प्रसिद्ध कृष्णानं हे दोन्ही बळी घेतले.
Site Admin | June 24, 2025 8:18 PM | Test cricket
𝐀𝐧𝐝𝐞𝐫𝐬𝐨𝐧-𝐓𝐞𝐧𝐝𝐮𝐥𝐤𝐚𝐫 𝐂𝐫𝐢𝐜𝐤𝐞𝐭 𝐓𝐫𝐨𝐩𝐡𝐲: इंग्लंडची विजयी लक्ष्याच्या दिशेनं दमदार वाटचाल
