डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला विजयासाठी १३५ धावांची गरज

अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारताला विजयासाठी १३५ धावांची गरज आहे.  लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात इंग्लडचा दुसरा डाव १९२ धावांवर संपला. दिवस अखेर भारताच्या दुसऱ्या डावात ४ बाद ५८ धावा झाल्या होत्या. 

 

रात्रीचा रखवालदार म्हणून आलेल्या आकाशदीपला इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स ने दिवसातल्या शेवटच्या चेंडूवर तंबूत परत पाठवलं. पहिल्या डावात शतक झळकावणारा के एल राहुल ३३ धावांवर खेळत आहे.   आज सामन्याचा अखेरचा दिवस आहे.  मालिकेत दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी एक सामना जिंकला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा