November 10, 2025 12:52 PM | Ande Sri

printer

प्रसिद्ध तेलुगु कवी, गीतकार आंदे श्री यांचं निधन

प्रसिद्ध तेलुगु कवी, गीतकार आंदे श्री यांचं आज निधन झालं. ते ६४ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ‘जय जय हे तेलंगणा’ हे  आंदे श्री यांनी लिहिलेलं गीत स्वतंत्र तेलंगणाच्या चळवळीत लाखो लोकांनी गायलं, हेच गीत पुढे तेलंगणाचं राज्य गीत म्हणून स्वीकारलं गेलं. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. आंदे श्री यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांच्यासह सर्व पक्षाच्या नेत्यांनी आदरांजली वाहिली आहे.