काश्मीर खोऱ्यातलं अनंतनाग स्थानक माल वाहतुकीसाठी खुलं

रेल्वेच्या उत्तर विभागानं काश्मीर खोऱ्यातलं अनंतनाग स्थानक माल वाहतुकीसाठी खुलं केलं आहे. काश्मीर खोऱ्यातल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशानं अनंतनाग स्थानकावरुन माल वाहतूक सुरू केल्याचं रेल्वेनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. यामुळे काश्मीर खोऱ्यातल्या फळं, हस्तकला आणि अन्य मालाला चांगली बाजारपेठ उपलब्ध होईल. विशेषतः हिवाळ्यात या स्वस्त, वेगवान आणि उत्तम दर्जाच्या वाहतूक सुविधेचा स्थानिकांना लाभ होणार आहे. काश्मीरच्या आर्थिक विकासासाठी केलेल्या या उपायांचं स्थानिक उद्योग संघटना आणि नागरिकांनी स्वागत केलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.