डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

कश्मीर खोऱ्यात अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार

कश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलं आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. 

 

श्रीनगर शहराच्या खान्यार परिसरात सुरक्षा दलांची शोधमोहीम सुरू असताना, दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. यात एक दहशतवादी ठार झाला. उस्मान ऊर्फ छोटा वलीद असं मारल्या गेलेल्या दशतदवाद्याचं नाव असून, तो बराच काळ सक्रिय होता आणि काश्मीर खोऱ्यातल्या अनेक दहशतवादी गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता अशी माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक व्ही. के. बिर्दी यांनी दिली. या कारवाईत जम्मू -काश्मीर पोलिसांचे दोन आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचे दोन असे चार जवान जखमी झाले आहेत, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.

 

अनंतनाग जिल्ह्यातही काही दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली होती. या शोधमोहिमेदरम्यानच दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या जवानांवर गोळीबर केला. त्याला दिलेल्या प्रत्यूत्तरात दोन दहशतवादी ठार झाल्याचं लष्करानं कळवलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.