डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 23, 2025 7:15 PM | anant garje

printer

महाराष्ट्र मंत्रालयातले स्वीय सचिवअनंत गर्जे यांची पत्नी गौरी पालवे यांची आत्महत्या

महाराष्ट्रातल्या मंत्रालयातले स्वीय सचिव अनंत गर्जे यांची पत्नी गौरी पालवे यांनी काल संध्याकाळी मुंबईतल्या आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. अनंत गर्जे हे पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सचिव म्हणून कार्यरत आहेत. गौरी पालवे सरकारी रुग्णालयात दंतरोगतज्ज्ञ म्हणून काम करत होत्या. त्यांचं गर्जे यांच्याशी फेब्रुवारी महिन्यात लग्न झालं होतं. ते पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याने गौरी यांनी हे पाऊल उचलल्याचा आरोप पालवे कुटुंबीयांनी केला आहे.
ही घटना अत्यंत धक्कादायक असून याची सखोल चौकशी करण्याच्या सूचना आपण पोलिसांना दिल्या असल्याचं पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.