November 3, 2024 11:45 AM | Madhya Pradesh

printer

मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पात झालेल्या हत्तींच्या मृत्यूची चौकशी सुरू

मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पात झालेल्या हत्तींच्या मृत्यूची चौकशी सरकारनं  सुरू केली आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या – वन्यजीव गुन्हे नियंत्रण कक्षाने, व्याघ्र प्रकल्पातल्या राखीव भागात झालेल्या दहा हत्तींच्या मृत्यूच्या चौकशीकरता एक पथक तयार केलं  आहे. हे पथक या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करत असून मध्य प्रदेश सरकारनेही या प्रकरणाच्या चौकशीसाठी पाच जणांची राज्यस्तरीय समिती स्थापन केली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.