पंजाब पोलिसांनी आज अमृतसरमध्ये केंद्रीय संस्थांच्या मदतीने केलेल्या कारवाईत अत्याधुनिक शस्त्र आणि ड्रग्ज मनी, अर्थात अमली पदार्थांशी संबंधित पैसा सीमापार तस्करी करणारं जाळं उघडकीला आणलं असून, या प्रकरणी ५ जणांना अटक केली.
आरोपींचा पाकिस्तानमधल्या आयएसआय या दहशतवादी संघटनेशी थेट संबंध असल्याचं पोलिसांना प्राथमिक तपासात आढळून आलं आहे. या कारवाईत एके सायगा ३०८ असॉल्ट रायफल, मॅगझिनसह दोन पिस्टल, १०० जिवंत काडतुसं आणि साडे सात लाख रुपये, एक कार आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.