केंद्रीय रेल्वमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बिहारसाठी देशभरातील विविध शहरांमधून चार नव्या अमृत भारत रेल्वे सुरू करण्याची घोषणा केली. त्यांच्या हस्ते काल बिहारमध्ये रेल्वेच्या विविध विकासकामांची पायाभरणी झाली, त्यावेळी ते बोलत होते. या चार रेल्वे गाड्या नवी दिल्ली-पाटणा, दरभंगा- लखनऊ, मालदा-लखनऊ आणि सहरसा-अमृतसर या मार्गांवर धावतील. समस्तिपूर विभागात त्यांनी कर्पुरीग्राम रेल्वेस्थानकातील विकासकामांची पायाभरणीही वैष्णव यांच्या हस्ते झाली.
Site Admin | July 8, 2025 9:14 AM | Amrit Bharat | Bihar
बिहारसाठी ४ नवीन अमृत भारत रेल्वे सुरू होणार
