रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज ३ अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांसह ७ नवीन गाड्यांचं लोकार्पण नवी दिल्ली स्थानकातून दूरस्थ पद्धतीने केलं. बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी पाटणा स्थानकात आयोजित कार्यक्रमात या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. या गाड्यांमुळे बिहारमधे महत्त्वाच्या शहरांमधला संपर्क सोपा झाला असल्याचं चौधरी म्हणाले.
या प्रकल्पाच्या मूळच्या तरतुदीत वाढ करुन ती आता १० हजार कोटी रुपये करण्यात आली असून विकासाची नवी संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशासमोर मांडली आहे असं वैष्णव म्हणाले. बिहारमधले इतर प्रलंबित प्रकल्पही वेगाने पूर्ण होत आहेत असं ते म्हणाले. दिवाळी आणि छठपूजेनिमित्त यंदा १२ हजार जादा गाड्यांची व्यवस्था रेल्वे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.