Amravati : शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी इथं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचं भूमीपूजन आणि कोनशिला अनावरण झालं. शेतकऱ्यांकडे कृषीच्या जोडीला एखादा जोडधंदा असेल तर त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. मत्स्योत्पादनाद्वारे हे उद्दिष्ट साधलं जाऊ शकत, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. प्रधानमंत्र्यांच्या दृष्टिकोनानुसार आपल्या नद्या आणि तलावांचा वापर करून देशात नीलक्रांती करण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत असल्याचं त्यांनी सांगितलं.