रत्नागिरी जिल्ह्यातल्या रोलर कोस्टर सायक्लोथॉन स्पर्धेत सांगलीचा अमन तांबोळी विजेता

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबनं आज, रत्नागिरी तालुक्यातल्या भाट्ये ते गावखडी या किनारी मार्गावर दुसरी रोलर कोस्टर सायक्लोथॉन स्पर्धा आयोजित केली होती.  स्पर्धेच्या खुल्या गटात सांगलीचा अमन तांबोळी विजेता ठरला. अमननं ४८ किलोमीटर अंतर एक तास १६ मिनिटांमध्ये पार  केलं. ५५ वर्षांवरच्या पुरुष गटात पुण्याचे प्रशांत तिडके, तर महिला गटात सांगलीच्या योगेश्वरी कदम यांनी विजेतेपद पटकावलं. मास्टर्स गटात मुंबईचा अनूप पवार विजयी झाला. सांगलीतले ८१ वर्षांचे सायकलिस्ट भीमराव सूर्यवंशी आणि मुंबईतल्या ६७ वर्षांच्या मंगला पै यांनी स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.