August 25, 2025 2:28 PM

printer

अमित शहा यांची विरोधी पक्षांवर टीका

१३० व्या घटना दुरुस्ती विधेयकाविरुद्धच्या निदर्शनं केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज विरोधी पक्षांवर टीका केली. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, शहा यांनी आरोप केला की विरोधी पक्षांचे नेते तुरुंगात असतानाही सरकार स्थापन करण्याचा आणि चालवण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

त्यामुळे विधेयकाविरुद्ध केलेली निदर्शनं लोकशाही विरोधी आहेत, असं शहा म्हणाले. या कायद्याच्या कक्षेत प्रधानमंत्र्यांना आणण्याचा आग्रह प्रधानमत्री नरेंद्र मोदी यांनीच केल्याचंही त्यांनी सांगितलं. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजिनाम्याबाबत विचारलं असता हा विषय आणखी न ताणण्याचं आवाहन त्यांनी विरोधकांना केलं.