डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 19, 2025 10:57 AM | Amit Shah

printer

प्रत्येक गावात क्रीडा संस्कृती पोहोचवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु- अमित शहा

देशातल्या प्रत्येक गावात क्रीडा संस्कृती पोहोचवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. 21व्या जागतिक पोलिस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धेतील भारतीय पथकाचा सन्मान त्यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर ते बोलत होते. गेल्या दहा वर्षात देशात खेळांना खूप महत्त्व देण्यात आलं असून त्यासाठी अर्थसंकल्पातील तरतूदही पाच पटीनं वाढवण्यात आल्याचं शहा म्हणाले. सरकार 2036 च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीसाठी तीन हजारपेक्षा अधिक खेळाडूंना दरमहा पन्नास हजारांची मदत करत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.