डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

अमित शहा नवी दिल्लीत अमली पदार्थविषयक समन्वय केंद्राच्या 7व्या शिखर परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नवी दिल्लीत अमली पदार्थविषयक समन्वय केंद्राच्या सातव्या शिखर परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.गुरुवारी होणाऱ्या या परिषदेत अमित शहा अमली पदार्थ प्रतिबंध माहिती केंद्र म्हणजे मानस या हेल्पलाइनचं उद्घाटन करणार आहेत.

 

अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या श्रीनगर विभागीय कार्यालयाचंही ते उद्घाटन करणार आहेत. अमली पदार्थांना आळा घालण्यासाठी विविध केंद्रीय आणि राज्य सरकारी संस्थांमध्ये समन्वय साधण्यासाठीच्या उपाययोजनांवर या परिषदेत चर्चा केली जाईल. भारताला 2047 पर्यंत अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी संस्थात्मक रचना, समन्वय आणि जनजागृती या त्रिसूत्रीवर काम केलं जाईल असं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.