डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

January 23, 2025 3:26 PM | Amit Shah

printer

अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईत होणाऱ्या एका कार्यक्रमात राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या कॉर्पोरेट कार्यालयाचं उद्घाटन शाह यांच्या हस्ते होणार आहे.

 

आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष २०२५ निमित्तानं वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन आणि देशभर नव्यानं स्थापन झालेल्या १० हजार नवीन बहुउद्देशीय सहकारी संस्थांसाठीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात अमित शाह यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.