केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज राजस्थानच्या एका दिवसाच्या भेटीवर जयपूर इथं जाणार आहेत. तीन नवीन फौजदारी कायदे लागू होऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे, त्यानिमित्त जयपूरमध्ये राज्यस्तरीय प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे, त्याचं उद्घाटन अमित शहा करणार आहेत
आजपासून सुरू होणाऱ्या 6 दिवसांच्या या प्रदर्शनात या तीन फौजदारी कायदयांमधील तरतूद आणि राजस्थानमध्ये त्यांची झालेली अंमलबजावणी दर्शवण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर शहा जनतेला संबोधित करतील. रायझिंग राजस्थान ग्लोबल इनव्हेस्टमेंट समिट 2024 अंतर्गत मिळालेल्या चार लाख कोटी रुपयांच्या करारातील, विविध योजनांच्या उद्घाटन आणि भूमिपूजनही त्यांच्या हस्ते होणार आहे.