डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 26, 2025 11:22 AM | Amit Shah | Make In India

printer

बँकांनी सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्राला अर्थसहाय्य करावं – केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांचं आवाहन

केंद्राचा मेक इन इंडिया अभियानाचा दूसरा टप्पा पुढील २५ वर्षांत जागतिक अर्थव्यवस्थेचा एक मोठा भाग असलेल्या उदयोन्मुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल एका पुरस्कार सोहळ्यात शाह बोलत होते. बँकांनी सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्राला अर्थसहाय्य करावं असं आवाहन त्यांनी केलं. गेल्या १० वर्षांत गरिबातील गरिबांना बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ५३ कोटी बँक खाती उघडण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.