डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 22, 2024 6:32 PM | Amit Shah | GUJRAT

printer

न्यायालयाचा हस्तक्षेप कमी व्हावा याकरता कायद्याचा मसुदा स्पष्ट पाहिजे – गृहमंत्री अमित शाह

न्यायालयाचा हस्तक्षेप कमीत कमी व्हावा याकरता कायद्याचा मसुदा स्पष्ट असला पाहिजे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. गुजरातमधे गांधीनगर इथं गुजरात विधानसभेच्या आमदारांसाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. कायदा सुस्पष्ट आणि त्रुटीविरहीत असला की त्याची अंमलबजावणी करणंही सोपं होईल, आणि लोकशाहीच्या कायापालटाला हातभार लागेल  असं ते म्हणाले. आमदारांनी कायद्याचा मसुदा तयार करण्याचं प्रशिक्षण घ्यावं असं आवाहन शहा यांनी केलं. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि विधानसभा अध्यक्ष शंकर चौधरी यावेळी उपस्थित होते. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.