डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

August 27, 2024 1:51 PM | Amit Shah

printer

पोलीस संशोधन आणि विकास विभागाच्या ५४ व्या स्थापना दिनाच्या सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या सहभागी होणार

B P R D अर्थात पोलीस संशोधन आणि विकास विभागाच्या ५४ व्या  स्थापना दिनाच्या सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या नवी दिल्लीत सहभागी होतील. यानिमित्ताने आयोजित डॉ. आनंद स्वरुप गुप्ता स्मृती व्याख्यानमालेत ‘नवीन फौजदारी कायदेः नागरीककेंद्रित सुधारणा’ या विषयावर शाह व्याख्यान देतील. यावेळी ते विशिष्ट सेवा आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदकप्राप्त झालेल्यांचा गौरव करतील. तसंच नवीन फौजदारी कायदे या विषयावरल्या इंडियन पोलीस जर्नल या विशेषांकाचं प्रकाशन करतील.