डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

बिहारमधे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाप्रणित लोकशाही आघाडीच्या नेत्यांची बैठक

बिहारमधे यावर्षी विधानसभा निवडणूक होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी आज भाजपाप्रणित लोकशाही आघाडीच्या नेत्यांची बैठक घेतली. मुख्यमंत्री नीतिश कुमार यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत भाजपा, जनतादल संयुक्त, लोकजनशक्ती पार्टी, हिंदुस्तानी अवाम मोर्चा, आणि राष्ट्रीय लोक मोर्चा या सर्व घटक पक्षांचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. बिहार विधानसभेत यावेळी २२५ जागा मिळवण्याचं उद्दिष्ट रालोआनं निश्चित केलं असून त्या दृष्टीनं रणनीती आखण्यावर या बैठकीत चर्चा झाली. अमित शाह यांनी काल पाटणा इथं भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

 

केंद्रीय  गृह मंत्री अमित शाह यांनी आज बिहारमधे सुमारे आठशे कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमीपूजन केलं. सहकार मंत्रालयाच्या अखत्यारीतल्या १११ कोटी रुपये खर्चाच्या आणि नगरविकास आणि गृहनिर्माण खात्याच्या अखत्यारीतल्या ४२१ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. पोलिसांसाठीच्या सदनिकांचं तसंच ३ महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामाची कोनशिला त्यांनी बसवली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.