सर्व प्रकारच्या सोयी सुविधा देऊ केल्यानंतरही शरण येत नसलेल्या माओवाद्यांविरोधात सरकारचं धोरण झीरो टॉलरन्सचंच राहील असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे.
सुरक्षा जवानांनी नक्षलमुक्त भारताच्या उद्दिष्टातला मोठा टप्पा आजच्या कारवाईत गाठला असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमधे म्हटलं आहे. पुढच्या वर्षी ३१ मार्चपर्यंत देशातून नक्षलवादाचा बीमोड झालेला असेल असा विश्वास त्यांनी या पोस्टमधे व्यक्त केला आहे.