November 20, 2025 10:53 AM

printer

एनसीडीसी हे सहकारी संस्थांना सक्षम करण्यासाठी उत्तम माध्यम ठरलं आहे- अमित शाह

राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ अर्थात एनसीडीसी हे सहकारी संस्थांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी एक उत्तम माध्यम ठरलं आहे, असं मत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी काल नवी दिल्ली इथं संस्थेच्या 92 व्या सर्वसाधारण परिषदेत व्यक्त केलं. 

 

साखर कारखाने आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात थेट शेतकऱ्यांना फायदा देणाऱ्या वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला चालना देण्याची गरज असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. देशातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा सुरू करण्यात एनसीडीसीची महत्त्वपूर्ण भूमिका नमूद केली.

 

गेल्या काही वर्षांत एनसीडीसीकडून सहकारी संस्थांना मिळणारी आर्थिक मदत जवळजवळ चार पटीने वाढून 95 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली असल्याची माहितीही त्यांनी दिली.