November 17, 2025 1:09 PM | Amit Shah

printer

केंद्रिय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेत आज उत्तर विभागीय मंडळाची बैठक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली हरियाणामधे फरिदाबाद इथं एन झेड सी अर्थात उत्तर विभागीय परिषदेची बैठक सुरू आहे. हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि चंडीगड या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश एन झेड सी मधे होतो.

 

या सर्व राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित आहेत. बैठकीच्या सुरुवातीला दिल्ली स्फोटात मरण पावलेल्यांना आदरांजली वाहण्यात आली. राज्यांमधे परस्पर समन्वय, पाणी प्रश्न आणि विकासकामं या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होत आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.