June 19, 2025 3:07 PM | Amit Shah

printer

स्थानिक भाषांसह जगाचं नेतृत्व करण्याची वेळ आली असल्याचं अमित शहा प्रतिपादन

देशाचा भाषिक वारसा अभिमानानं मिरवून, स्थानिक भाषांसह जगाचं नेतृत्व करण्याची वेळ आली असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. नवी दिल्लीत पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. परकीय भाषांमध्ये भारतीय संस्कृती आणि इतिहास चांगल्या पद्धतीने समजत नाही. त्यासाठी स्थानिक भाषाच हव्या, असं ते म्हणाले.