डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

June 11, 2025 10:57 AM | Amit Shah

printer

पुर व्यवस्थापन तंत्रआधारित यंत्रणेच्या माध्यमातून करावं- गृहमंत्री अमित शहा

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर देशातील पूर व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली इथं उच्चस्तरीय बैठक झाली. नदीच्या आसपास पुराचा धोका कमी करण्यासाठी राबवण्यात आलेल्या उपाययोजनांचा तसंच गेल्या वर्षी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांवर कोणती पावले उचलली आहेत याचा आढावा त्यांनी घेतला.

 

नवीन तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा, पूर व्यवस्थापनासाठी परस्पर सहकार्यानं कसं काम करेल यावर सविस्तर चर्चा झाल्याचं गृह मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शक सुचनांचं पालन करुन  या पावसाळ्यात सर्व स्तरावर अपघात टाळून आपत्ती व्यवस्थापन कराव अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.