अमेरिकेच्या नॅसडॅक तसेच एस अँड पी निर्देशांकात काल विक्रमी वाढ झाल्यामुळे अमेरिकेचा शेअर बाजार वधारला आहे. अमेरिकेच्या आयात शुल्क वाढीच्या निर्णयाची १ ऑगस्ट ही तारीख जवळ येत असल्याने जगभरातल्या शेअर बाजार गुंतवणूकदारांचं लक्ष तिथे केंद्रित झालं आहे.
दरम्यान मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स दिवसभराच्या चढउतारानंतरही फारसा फरक न पडता फक्त १३ अंकांनी कमी होऊन ८२ हजार १८७ अंकांवर बंद झाला . राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३० अंकांनी घसरून २५ हजार ६१ अंकांवर बंद झाला आहे.