अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अन्नपदार्थ आयातीवरचे कर कमी केले आहेत. भारतातून विशेषतः महाराष्ट्रातून होणाऱ्या आंबा आणि डाळिंबाच्या निर्यातीला याचा लाभ होणार आहे. उष्णकटिबंधीय प्रदेशातून येणारी फळं आणि फळांचे रस, चहा आणि मसाले यांच्यावर परस्पर शुल्काचा परिणाम होणार नाही. व्हाईट हाऊसनं नमूद केलेल्या इतर वस्तूंमध्ये कॉफी आणि चहा, कोको, संत्री, टोमॅटो यांचा समावेश आहे. ट्रम्प यांनी यापूर्वी भारतातून होणाऱ्या आयातीवर २५ टक्के शुल्क लादलं होतं आणि रशियाकडून इंधन तेल खरेदी केल्याबद्दल अतिरिक्त २५ टक्के दंडात्मक शुल्क लावलं होतं. अमेरिकेतील महागाई रोखण्यासाठी, ट्रम्प यांनी यापूर्वी जेनेरिक औषधांना शुल्कातून सूट दिली त्याचाही भारताला लाभ झाला. अमेरिकेला निर्यात होणाऱ्या निर्धारित जेनेरिक औषधांपैकी ४७ टक्के औषधं भारतातून पुरविली जातात.
Site Admin | November 16, 2025 2:43 PM | America | DonaldTrump
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले अन्नपदार्थ आयातीवरचे कर कमी