अमेरिकेत सरकारी कामकाज बंद पडल्याचा परिणाम हवाई वाहतूक सेवेवर झाला असून सुमारे सतराशे उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. अमेरिकेतल्या प्रमुख विमानतळांवरच्या उड्डाणांमधे ४ टक्के कपात करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीनं उड्डाणांची संख्या कमी करणं आवश्यक असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. शटडाऊनच्या तिढ्यावर तोडगा निघाला नाही तर उड्डाणकपात १५ ते २० टक्के होई शकते असं अमेरिकेचे वाहतूक मंत्री शॉन डफी यांनी म्हटलं आहे.