डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपतींच्या शुभेच्छा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिवादन केलं असून, देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. बाबासाहेबांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून देदीप्यमान कामगिरी करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. अलौकिक क्षमतांनी उजळून निघालेलं त्यांचं जीवन कार्य प्रेरणादायी आहे, असं राष्ट्रपतींनी शुभसंदेशात म्हटलं आहे.