डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त देशभरात विशेष पदयात्रांचं आयोजन

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीच्या एक दिवस आधी देशभरात विविध ठिकाणी पदयात्रा काढली जात आहे.  

 

विकसित भारताच्या उभारणीसाठी बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, न्याय आणि बंधुत्वाच्या दृष्टिकोनातून प्रेरणा घेण्याचं आवाहन केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज युवकांना केलं आहे. बिहारमध्ये पटना इथं गांधी मैदानापासून सुरु होणाऱ्या पदयात्रेला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी आंबेडकर जयंतीनिमित्त दिल्ली सरकारनं आज दिल्लीत वॉकेथॉनचं आयोजन केलं आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या वॉकेथॉनला हिरवा झेंडा दाखवला या पदयात्रेत हजारो मुलांनी सहभाग घेतला. 

 

आंबेडकर जयंतीनिमित्त  युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आज मुंबईत भीम पदयात्रेत सहभागी झाल्या.

 

नरिमन पॉइंट पासून  मंत्रालयात आंबेडकर पुतळ्यापर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली. यावेळी पदयात्रेत हजारो संख्येनं तरुण सहभागी झाले. 

 

छत्तीसगढ मध्ये रायपूर इथं आज जय भीम पदयात्रेचे आयोजन इथं करण्यात आलं. यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई उपस्थित होते. 

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त राज्यात आज सकाळी जिल्हा प्रशासनाच्यावतीनं जय भीम पदयात्रा काढण्यात आली. पथनाट्य आणि परिसंवादासह शाळेत राज्यघटनेची उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं  तसंच नांदेड आणि बीड इथंही आज जिल्हा प्रशासन, जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्राच्या समन्वयानं जय भीम पदयात्रा काढण्यात आली.

 

आंबेडकर जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या पर्यटन विभागाच्या पर्यटन संचालनालयानं येत्या १४ आणि १५ एप्रिलला मुंबई, नाशिक आणि नागपूर इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट सहलीचं आयोजन केलं आहे. या टूर सर्कीटमध्ये दादरमधील चैत्यभूमी, राजगृह, प्रिटींग प्रेस, परळ मधील बि.आय.टी चाळ, वडाळा इथलं डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, फोर्ट मधील सिद्धार्थ महाविद्यालय या स्थळांचा समावेश आहे.

 

आंबेडकर जयंतीनिमित्त उद्या नवी दिल्लीत संसद भवनात केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने आंबेडकर जयंतीचा उत्सव आयोजित केला आहे.  राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, आणि इतर मान्यवरांच्या हस्ते सकाळी बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून उत्सवाची सुरुवात होईल. हा कार्यक्रम दुपारी १२ नंतर सर्वांसाठी खुला असेल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा