अमेरिकेतला मोठा उद्योगसमूह ॲमेझॉन ने भारतात २०३० पर्यंत ३५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे उपाध्यक्ष अमित अगरवाल यांनी आज नवी दिल्लीत आयोजित ॲमेझॉन संभव परिषदेत ही घोषणा केली.
विकसित भारताच्या उद्दिष्टांशी ॲमेझॉनची प्रगती सुसंगत असल्याचं सांगून ते म्हणाले की या गुंतवणुकीतून १० लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात क्षमतावाढ, दळणवळण आणि इतर पायाभूत सुविधाविकास , रोजगारनिर्मिती आणि लहान उद्योगांना पाठिंबा ही या गुंतवणुकीची उद्दिष्टं असतील.याआधी मायक्रोसॉफ्टने १७ अब्ज डॉलर्स गुंतवणुकीची घोषणा केली आहे.