वार्षिक अमरनाथ यात्रा प्रतिकूल हवामान आणि खराब रस्ते या कारणांमुळे आजपासून स्थगित करण्यात आली आहे. ही यात्रा ९ ऑगस्ट रोजी समाप्त होणार होती. तीन दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली होती.
मात्र बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्ग यात्रेसाठी सुरक्षित नसून या मार्गांवरून यात्रा पुन्हा सुरू होणार नसल्याची घोषणा काल अधिकाऱ्यांनी केली. यावर्षी सुमारे चार लाख यात्रेकरूंनी अमरनाथ गुहेचं दर्शन घेतलं आहे.