जम्मू काश्मिरमध्ये अमरनाथ यात्रेकरूंचा आणखी एक जथा आज सकाळी जम्मूहून रवाना झाला. भगवती नगर यात्री निवासातून काश्मिरसाठी निघालेल्या या जथ्थ्यात ६ हजार १४३ यात्रेकरू आहेत.
१०० वाहनांचा पहिला ताफा २ हजार २१५ यात्रेकरूंना घेऊन बालतालकडे जाण्यासाठी तर १३५ वाहनांचा दुसरा ताफा ३ हजार ९२८ यात्रेकरूंना घेऊन पहलगाम कडे जाण्यासाठी निघाला. अमरनाथ यात्रेदरम्यान आतापर्यंत दोन लाखांहून अधिक यात्रेकरूंनी अमरनाथ गुंफेपर्यंत पोहचून दर्शन घेतलं आहे.