अमरनाथ यात्रेला सुरूवात झाली असून दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाम आणि मध्य काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यातल्या बालताल या दोन्ही मार्गांवरून कडक सुरक्षेत यात्रेकरू रवाना झाले.
२६८ वाहनांमधून यात्रेकरू रवाना झाले असून यापैकी १ हजार ९९३ यात्रेकरू बालटालला आणि ३ हजार २५३ यात्रेकरू पहलगामकडे रवाना झाले आहेत.
या यात्रेकरूंना दोन्ही मार्गांवरून पवित्र गुहेकडे जाण्याची परवानगी देण्यात आली असून ही गुहा हिमालयात १२ हजार ७५६ फूट उंचीवर आहे.