अमरनाथ यात्रा सुरळीत सुरू असून काल २३,८५७ भाविकांनी दर्शन घेतलं. पहिल्या सहा दिवसांत दर्शन घेणाऱ्या यात्रेकरूंची संख्या ९३ हजारांहून अधिक झाली असून, आज हा संख्या एक लाखाच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कडक सुरक्षा व्यवस्थेत काल जम्मूतील भगवती नगर तळावरून ७५४१ यात्रेकरूंची सातवी तुकडी पुढील तळाकडे रवाना झाली. यापैकी ३३२१ यात्रेकरू आज पहाटे बालाताल तळाकडे आणि ४२२० पहलगाम तळाकडे रवाना झाले, तिथून ते अमरनाथकडे निघतील.