डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

Amarnath Yatra 2024: चार हजार ८८९ यात्रेकरुंचा जत्था जम्मूच्या भगवती नगर शिबीरातून रवाना

अमरनाथ यात्रेसाठी चार हजार ८८९ यात्रेकरुंचा जत्था आज जम्मू इथल्या भगवती नगर शिबीरातून रवाना झाला.

 

सुमारे १८७ वाहनांमधून यात्रेकरुंनी आज सकाळी आपल्या प्रवासाला सुरुवात केली. यामध्ये ३ हजार ६७२ पुरुष, एक हजार ८६ महिला, २१ बालकं, ८८ साधू आणि २२ साध्वी यांचा समावेश आहे.

 

यापैकी १ हजार ८९६ यात्रेकरू, पहाटे बालताल बेस कॅम्पसाठी रवाना झाले तर २ हजार ९९३ यात्रेकरू पहलगाम बेस कॅम्पसाठी रवाना झाले. तिथून ते पवित्र गुहेच्या दिशेनं पुढे मार्गक्रमण करतील.