जम्मूमधून निघणारी अमरनाथ यात्रा प्रतिकूल हवामानामुळे आज सलग दुसऱ्या दिवशीही स्थगित झाली. भगवती नगर यात्रेकरु थांबले असून तिथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. ही यात्रा गेल्या महिन्यात ३ तारखेला सुरू झाली. आतापर्यंत ४ लाखांहून अधिक यात्रेकरूंनी अमरनाथ गुंफेत जाऊन दर्शन घेतलं आहे. मात्र, १७ जुलै रोजी पहलगाम आणि बालताल इथल्या तळांच्या परिसरात मुसळधार पाऊस झाल्यामुळे ही यात्रा स्थगित करण्यात आली होती. अमरनाथ यात्रा येत्या ९ तारखेला श्रावण पौर्णिमेला संपणार आहे.
Site Admin | August 1, 2025 1:12 PM | Amarnath Yatra
अमरनाथ यात्रा प्रतिकूल हवामानामुळे दुसऱ्या दिवशीही स्थगित
