डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

June 9, 2025 3:37 PM | Almatti Dam

printer

अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासंदर्भात ४ लाभार्थी राज्यांची १८ जूनला बैठक

कर्नाटकातल्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासंदर्भात केंद्र सरकारने कर्नाटकसह महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या ४ लाभार्थी राज्यांची १८ जून रोजी बैठक बोलावली आहे. केंद्रीय जलसंपदा मंत्री सी.आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. 

 

कृष्णा पाणी वाटप लवादाने २०१३ साली कर्नाटक सरकारच्या  मागणीवरुन, अलमट्टी धरणाची उंची ५१९ मीटरवरून ५२४ मीटर करण्याची अनुमती दिली. मात्र या पाणी साठ्यामुळे महाराष्ट्रात सांगली आणि कोल्हापूर शहरात पूर येत असल्याच्या कारणावरुन राज्य सरकारने धरणाची उंची वाढवायला विरोध केला आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगण या राज्यांनीही  कृष्णा पाणी वाटप लवादाच्या निवाड्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यामुळे लवादाचा निर्णय अंमलात आणायचा झाल्यास चारही राज्यांची संमती मिळवण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा