July 31, 2025 9:41 AM | allms

printer

राष्ट्रपती मुर्मू आज झारखंडमधील AIIMS च्या पहिल्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज झारखंडमधील देवघर येथील AIIMSच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. दीक्षांत समारंभात त्या ४ सुवर्णपदक विजेत्या आणि ५ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करतील.

 

राष्ट्रपती उद्या आयआयटी-आयएसएम धनबादच्या ४५ व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील, जिथे त्या २० सुवर्णपदक विजेत्यांचा सत्कार करतील.

 

त्यांच्या भेटीपूर्वी देवघर, धनबाद आणि रांची या झारखंडमधील तिन्ही शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.