डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 15, 2024 10:27 AM | PM Narendra Modi

printer

सर्व राजकीय पक्षांनी विचारसरणीपेक्षा देशाला अधिक प्राधान्य द्यावं – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

प्रधानमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी काल राज्यात तीन ठिकाणी प्रचार सभा घेतल्या. काँग्रेस आणि महाविकास आघाडी सत्तेत आली तर आरक्षण हटवेल, असा आरोप मोदी यांनी काल मुंबईत शिवाजी पार्कवर घेतलेल्या सभेत केला. अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी यांची एकजूट तोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. हे लोक आपापसात लढले तर काँग्रेस मजबूत होईल, असा दावा त्यांनी या सभेत केला. सर्व राजकीय पक्षांनी विचारसरणी पेक्षा देशाला अधिक प्राधान्य द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. या विधानसभा निवडणुकीतील पंतप्रधानांची ही राज्यातील शेवटची प्रचारसभा होती. यावेळी त्यांनी जमलेल्या कार्यकर्त्यांना महायुतीच्या उमेदवारांना जिंकून देण्याचं आवाहन केलं आणि त्याचवेळी महायुती सरकारच्या शपथविधीचं आमंत्रण दिलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.