डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सात बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळाच्या वेगवेगळ्या देशांना भेटी

दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सात बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळं वेगवेगळ्या देशांना भेटी देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं कतारमध्ये दोहा इथं शूरा परिषदेच्या उपसभापती डॉ. हमदा अल सुलैती आणि इतर कतारी खासदारांची भेट घेतली. शिष्टमंडळानं कतारच्या विधिमंडळाला ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती दिली आणि दहशतवादा विरुद्धच्या जागतिक लढाईत पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. हे शिष्टमंडळ येत्या काही दिवसांत दक्षिण आफ्रिका, इथिओपिया आणि इजिप्तला भेट देणार आहे.

 

खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळाने बहरीनच्या शूरा कौन्सिलचे अध्यक्ष आणि उपप्रधानमंत्र्यांची भेट घेतली. खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं दक्षिण कोरियाला भेट दिली. खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं, न्यूयॉर्क इथं ९/११ स्मारकाला भेट देऊन दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली.

 

द्रविड मुनेत्र कळघम पक्षाच्या खासदार कनिमोळी यांच्या अध्यक्षतेखालच्या शिष्टमंडळानं मॉस्को दौरा यशस्वीपणे पूर्ण केला असून आता ते स्लोव्हेनियाकडे रवाना झाले आहेत. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त अरब अमिरातला गेलेल्या शिष्टमंडळानं आपला दौरा पूर्ण केला असून ते आता काँगोमध्ये पोहोचले आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा