डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

दहशतवादाविरुद्ध भारताचं धोरण स्पष्ट करण्यासाठी गेलेल्या ४ शिष्टमंडळांचा दौरा पूर्ण

दहशतवादाविरुद्ध भारताच्या शून्य सहिष्णुतेचं धोरण स्पष्ट करण्यासाठी जगभरातल्या विविध देशांना भेट देण्यासाठी गेलेल्या सात बहुपक्षीय शिष्टमंडळांपैकी ४ शिष्टमंडळं भारतात परतली आहेत. या दौऱ्यात शिष्टमंडळांनी विविध परदेशी नेते, वरिष्ठ अधिकारी, प्रभावशाली विचारवंत, माध्यमं आणि भारतीय समुदायांशी संवाद साधला.

 

शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ आज सकाळी यूएई, लायबेरिया, काँगो आणि सिएरा लिओनला भेट देऊन भारतात परतलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ आज दुपारी देशात परतणार आहे. या शिष्टमंडळाने कतार, दक्षिण आफ्रिका, इथिओपिया आणि इजिप्तला भेट दिली. 

 

 

भाजपा खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ सध्या बेल्जियममध्ये युरोपियन यूनियनच्या मुख्यालयाला भेट देत आहे. काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ वॉशिंग्टन डीसीला पोहोचलं. तिथे त्यांनी अमेरिकन काँग्रेसचे सदस्य आणि प्रशासन तसंच माध्यम प्रतिनिधींना भेटून त्यांना ऑपरेशन सिंदूर आणि दहशतवादाविरुद्ध भारताच्या भूमिकेबद्दल माहिती दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा