डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळाच्या वेगवेगळ्या देशांना भेटी

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, दहशतवादाविरोधातली भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी  बहुपक्षीय शिष्टमंडळं जगभरातल्या  विविध देशांना भेट देत आहेत. त्या देशांचे उच्चपदस्थ अधिकारी, प्रभावशाली व्यक्ती, माध्यम प्रतिनिधी आणि तिथल्या भारतीय समुदायाशी ते संवाद साधत आहेत.

 

भाजपा खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ अल्जेरिया, सौदी अरेबिया, कुवेत आणि बाहरीन इथं भेट देऊन आज सकाळी मायदेशी परतलं. 

 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं कैरो मध्ये इजिप्तच्या परराष्ट्र व्यवहार परिषदेची भेट घेतली.

 

लायबेरियामध्ये, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं राष्ट्राध्यक्ष जोसेफ न्युमा बोआकाई आणि लायबेरियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सारा बेयसोलो न्यांती यांची भेट घेतली.

 

द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ रशिया, लाटविया, स्लोव्हेनिया, ग्रीस आणि स्पेनचा दौरा करून आज परत येईल.

 

काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळाने ब्राझीलमधले उच्चपदस्थ नेते आणि अधिकाऱ्यांची भेट  घेतली.  दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यासाठी  हे शिष्टमंडळ अमेरिकेला रवाना होईल. या शिष्टमंडळांनी विविध देशांच्या भेटीदरम्यान, सर्वप्रकारच्या दहशतवादाविरोधात भारताचा शून्य सहनशीलतेचा ठाम संदेश दिला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा