डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळाच्या वेगवेगळ्या देशांना भेटी

दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सात बहुपक्षिय शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांना भेटी देत आहेत. 

 

काँग्रेस खासदार शशि थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज कोलंबियाच्या परराष्ट्र व्यवहार उपमंत्री रोझा योलांडा व्हिलाविचेंसिओ यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान पाकिस्तानबद्दल शोक व्यक्त करणाऱ्या कोलंबियाच्या विधानावर थरूर यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र भारताच्या भूमिकेला कोलंबियानं पाठिंबा दिला असून हे विधान मागे घेतल्याचं त्यांनी समाजमाध्यमावर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. 

 

शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सिएरा लिओनचा दौरा पूर्ण केला. शिष्टमंडळाने संसदेचे सभापती, उपसंरक्षण मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा समन्वयक, यांच्यासह सिएरा लिओनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. 

 

द्रमुक खासदार कनिमोळी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने लाटवियामधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.