सर्वपक्षीय शिष्टमंडळाचा सौदी अरेबियातल्या तीन दिवसांच्या राजनैतिक मोहिमेचा समारोप

दहशतवादा विरोधात भारताची भूमिका जगाला पटवून देण्यासाठी गेलेल्या भारताच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने काल सौदी अरेबियातल्या तीन दिवसांच्या राजनैतिक मोहिमेचा समारोप केला. या शिष्टमंडळाचं नेतृत्त्व भाजपा खासदार बैजयंत पांडा यांनी केलं. त्यांच्या सौदी भेटीदरम्यान, भारतीय प्रतिनिधींनी रियाधमधील गल्फ रिसर्च सेंटरचे अध्यक्ष डॉ. अब्दुलअजीज सागर आणि नायफ अरब युनिव्हर्सिटी फॉर सिक्युरिटी सायन्सेसचे अध्यक्ष डॉ. अब्दुलमाजीद अल्बानयान यांची भेट घेतली.