बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. पहिल्या टप्प्यातलं मतदान ६ नोव्हेंबर रोजी होणार असून मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सर्व पक्षांचे उमेदवार करत आहेत. या पार्श्वभूमीवर रालोआ आणि महाआघाडीचे नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.
बिहारमधे रालोआची लाट असून यावेळीही राज्यात राओलाचंच सरकार स्थापन होईल, असा विश्वास लोकजनशक्ती पार्टी रामविलासचे प्रमुख चिराग पासवान यांनी व्यक्त केला. तर महाआघाडी गुन्हेगारांना पाठिंबा देत असल्याचा आरोप भाजपा खासदार मनोज तिवारी यानी केला.
दुसरीकडे बिहारची जनता आपल्याला भरघोस पाठिंबा देत असून जनता महाआघाडीचं सरकार स्थापन करेल असा विश्वास भाकप महासचिव डी राजा यांनी व्यक्त केला.